राऊतांचा जिना संपला की वागळेंचा उतार

 


राऊतांचा जिना संपला की वागळेंचा उतार 

वृत्त एकसत्ता न्यूज

मुंबई दिनांक 08/04/2025 : सध्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत हे केवळ शिल्लक शिवसेनेचे खासदार नसून ते आता पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर महंमद अली जिना यांचे मसिहा झाले आहेत , तर त्यांचे कधीकाळी नव्हे तर आजकालचे कट्टर वैरी दैनिक महानगरचे माजी संपादक निखिल वागळे हे भारतीय मीठ चाखत चाखत आता पाकिस्तानचे जिने  उतरताना एकाच समांतर रेषेत दिसतात हे पाहून भारताला या  अस्सल दोन मोठ्या मराठमोळ्या संपादकांनी कुठे नेऊन ठेवलाय.

       काय असतं ' जो करेल तो भरेल ' ही म्हण जरी खरी असली तरी कान भरणारा गलेलठ्ठ नामानिराळा राहतो अन् भरायला दुसऱ्याला लावतो याचा अर्थ असा की साप तर मेला पाहिजे पण काठी माझी नको असली ही नालायक अवलाद नाही तर दुसर तिसरं काही नसत , कारण नावातच पवार असल्याने कळवंडया काढणे काही नतद्रष्ट्य मास्तरकीच्या पेशाला शोभत का ? त्यामुळे सर्वसामान्य  माणूस नाहक भरडला जातोय त्याच काय ? असो ज्याच त्याच गलितगात्र आपण तरी काय किस झाड की पत्ती कारण ते काटेवाडीचे पवार मास्तर.

     हे सगळ पुराण सांगण्याचा मतितार्थ असा की शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी कधीकाळी मुंबईतील सांय दैनिकाचे संपादक निखिल वागळे यांना भरीला घालून दस्तूरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वामकुक्षी उडवली होती कारण त्यावेळी शिवसेनेला अंगावर घेणारा एकमेव संपादक निखिल वागळे असतं ! आता तर जी हुजुर करणाऱ्या संपादकांची मांदियाळी आहे जो उठतो तो संपादक म्हणूनच जन्माला येतो , आता त्याला  कोण काय करणार म्हणून आजही भारतात लोकशाही गुण्यागोविंदाने नांदत आहे हेच तर तुमचं आमचं नशीब आहे .

       हेच निखिल वागळे शिवसेनेला सतत अंगावर घेऊन स्वतःचा जीव अनेकदा धोक्यात घालत होते कारण त्यांना पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर महंमद अली जिना फारच पितृतुल्य होते पण याच काळात  दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिल्लक शिवसेनेचे खासदार विश्व प्रवक्ते संजय राऊत हे मात्र भारत हा पाकिस्तानचा गुलाम नसून तो कधीतरी हिंदूराष्ट्र होईल अशी अपेक्षा बाळगून होते पण झालं उलटं अन् तागड झाल पालट .

        जे संजय राऊत एक संपादक म्हणून हिंदूराष्ट्राचा जीना चढत होते त्याचवेळी बारामतीच्या काकांनी त्या जिण्याला असा काही कासरा लावला की त्या जिण्याच फळकुटच भुसभुशीत होऊन घसरणीवर आलं , पण त्याच वेळी ' निर्भय बनो ' करत निखिल वागळे यांनी जी महाराष्ट्रातील विविध मतदार संघातून विधानसभा निवडणुकीच्या काळात वरात काढली त्याच वरातीचा पुरता फज्जा उडाला त्यामुळे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा संभाव्य पाकिस्तान होण्याचा जिना संपला रे संपला की लागलीच निखिल वागळे यांचा उतार सुरू होतो याचा मतितार्थ तुम्ही अती चाणाक्ष वाचक बारकाईने अभ्यासपूर्वक समजून उमजून घेऊ शकता नाही का ॽ तर असो कारण बरेच दिवस या दोन महान संपादकांची तुलना करता करता राहून गेलं अर्थात इतक्या तोडक्या शब्दात ते निभावून नेता येणार नाही हेही मला मनस्वी ज्ञात आहे .

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .

पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या