केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत कोडोलीच्या यशवंत बी. एड. महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांसह टेट परीक्षेत एक प्राध्यापक यशस्वी

 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत कोडोलीच्या यशवंत बी. एड. महाविद्यालयाच्या  सात    विद्यार्थ्यांसह  टेट परीक्षेत एक प्राध्यापक यशस्वी 

वृत्त एकसत्ता न्यूज/ प्रतिनिधी

कोडोली (ता.पन्हाळा,जि. कोल्हापूर ) / ता. ७ :  येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील   सात विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत ( CTET ) यश प्राप्त केले असून एका प्राध्यापकाने  राज्यस्तरीय टेट परीक्षेत यश प्राप्त केले आहे.   प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी ही माहिती दिली.

येथील  श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील , अध्यक्षा  पद्मजा प्रदीप पाटील आणि विश्वस्त  विनिता जयंत पाटील यांनी  यशस्वीतांचे अभिनंदन केले आहे. तसेच प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनीही यशस्वीतांना  व्यावसायिक व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या